Verified By Apollo Cardiologist October 21, 2023
2684ह्रदयाइतके, शरीराच्या कोणत्याही अवयवाबाबत भावनिक आव्हान केले जात नाही. ह्रदय नक्कीच भावनांना प्रतिक्रिया देते. उत्सुकतेमुळे निर्माण झालेल्या ऍड्रिनलिनच्या जोरदार प्रवाहामुळे ह्रदयाचे ठोके जोरात पडतात! परंतु कार्यात्मक वर्तनामध्ये, तो एक साधा यांत्रिक पंप आहे जो विराम न देता निरंतर काम करत असतो. आपले ह्रदय दिवसाला १,००,००० वेळा ठोके देते, दर २४ तासांमध्ये संपूर्ण शरीरात ५००० गॅलन रक्ताचे अभिसरण करते. ते ऑक्सिजन आणि पोषक घटकांनी समृद्ध रक्ताचा आपल्या उतींना पुरवठा करते आणि कचरा वाहून नेते. जीवनाची खरी भावना व्यक्त करण्यासाठी हृदयाइतके अचूक दुसरे उदाहरण नाही; साधे, चिरस्थायी, असुरक्षित आणि अनपेक्षित.
ह्रदय हा स्नायूंपासून बनलेला एक अवयव आहे जो छातीमध्ये किंचितसा डावीकडे बसवलेला असतो आणि साधारण तुमच्या बंद मुठीच्या आकाराचा असतो. त्याची दोन भागांमध्ये विभागणी झालेली असते; उजवा आणि डावा भाग, यांची आणखी दोन भागांमध्ये विभागणी झालेली असते, कर्णिका आणि जवनिका. उजव्या भागाला शरीराकडून रक्त पुरवठा केला जातो आणि हा भाग ऑक्सिजन मिसळण्यासाठी ते रक्त फुफ्फुसांमध्ये पाठवतो आणि डाव्या भागाला ऑक्सिजनने समृद्ध रक्त मिळते जे नंतर संपूर्ण शरीरात पाठवले जाते. अशाप्रकारे शरीराचा रक्तपुरवठा फुफ्फुसाशी निगडीत असतो आणि ह्रदय मध्यस्थाचे कार्य करते. रक्तातून संपूर्ण शरीराला पुरवला जाणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे प्राणवायू (ऑक्सिजन) आणि आपल्याला जिवंत राहण्यासाठी याची निरंतर आवश्यकता असते. या पुरवठ्यामध्ये काही मिनिटे जरी अडथळा आला तरी तो जीवन मरणाचा प्रश्न असतो.
झडपांनी सुरक्षित केलेले ह्रदयाचे स्नायू समक्रमित पद्धतीने काम करतात. रक्त घेण्यासाठी ते शिथिल होतात आणि शरीरात रक्त पाठवण्यासाठी त्यांचे आकुंचन होते. शरीराच्या रोहिण्यांमध्ये हे आकुंचन जाणवते, यालाच नाडी म्हणतात. जेव्हा डॉक्टर तुमचे मनगट चाचपडून पाहतात तेव्हा ते हे आकुंचनच तपासून पाहात असतात. याच आकुंचनामुळे रक्तदाबही निर्माण होत असतो. आपल्याला सर्वांना माहीत आहे की रक्तदाबाचे एक वरचे व एक खालचे मूल्य असते. आकुंचनामुळे डाव्या बाजूला निर्माण होणारा दाब सिस्टॉलिक दाब निर्माण करतो आणि शिथिलीकरणामध्ये या कप्प्यात जो दाब राहतो तो डायॉस्टॉलिक दाब असतो. हे सर्व आपल्या शरीरात अतिशय शांतपणे चालू असते, आपल्याला ना त्याचे आकुंचन जाणवते ना कंपन. जर व्यायामानंतर किंवा असामान्य तालामुळे, ह्रदयाचे ठोके वेगाने पडले तरच आपल्याला आपल्या स्वतःच्या ह्रदयाचे ठोके जाणवतात. याला ह्रदयाची धडधड म्हणतात आणि व्यायाम किंवा श्रम न करताही जर अशी धडधड ऐकू येत असेल तर ते ह्रदयाच्या आजाराचे निदर्शक असू शकते.
ह्रदयाच्या स्नायूंना निरंतर रक्तपुरवठा आवश्यक असतो जो त्यांना त्यांच्या कप्प्यांतील रक्तामधून घेता येत नाही. या रक्ताचा पुरवठा हृदयाच्या रोहिण्या नावाच्या रक्तवाहिन्यांच्या संचाद्वारेच केला जावा लागतो. या रक्तवाहिन्या ह्रदयावर मुकुट बसवल्यासारख्या वेढलेल्या असतात म्हणून त्यांना हृदयाच्या रोहिण्या म्हणतात. या वाहिन्यांमध्ये आलेला अडथळा हे ह्रदय रोगाचे मुख्य कारण असते, यालाच हृदयाच्या रोहिणीचा आजार म्हणतात. जवनिकेमध्ये रोहिणीचा प्रारंभ होतो आणि काही ठिकाणी परस्परांच्या वरून जाणाऱ्या व ह्रदयाच्या भिन्न भागांना रक्तपुरवठा करणाऱ्या तीन मुख्य वाहिन्यांमध्ये या रोहिणीचे विभाजन होते. ह्रदयाच्या कार्यासाठी या वाहिन्या खुल्या, विना अडथळा आणि विस्तारलेल्या असणे व त्यातून प्रवाह सुरळीत चालू राहणे महत्त्वपूर्ण असते. आपल्या संपूर्ण आयुष्यात, अथेरोस्क्लेरोसिसमुळे (रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींवर मेद जमा झाल्यामुळे होणारा रोहिण्यांचा विकार) रक्तवाहिन्या आतून बंद होतात, त्यांची क्षमता कमी होते आणि ह्रदयाच्या स्नायूंना होणारा रक्त व प्राणवायूचा पुरवठा कमी होतो. काही प्रमाणात वाढत्या वयाची प्रक्रिया म्हणून अथेरोस्क्लेरोसिसचा विचार केला जाऊ शकतो, परंतु जे लोक ह्रदयाचा आजार होण्यास प्रवण असतात त्यांच्यामध्ये ही प्रक्रिया वेगाने होते. अथेरोस्क्लेरोसिसचे जोखीम घटक म्हणजे मधुमेह, हायपरटेन्शन, धूम्रपान, असामान्य कोलेस्टेरॉल आणि कौटुंबिक इतिहास.
जेव्हा प्राणवायूचा पुरवठा गुंतागुंतीच्या पातळीहून कमी होतो तोव्हा छातीत दुखायला लागते. छातीच्या मध्यभागी आवळल्याची भावना, जडपणा जाणवतो आणि वरचा जबडा तसेच बेंबीच्या खाली सुद्धा वेदना जाणवू शकतात. स्त्रिया आणि मधुमेही व्यक्तींना विशिष्ट वर्गात न बसणारी छातीतील वेदना होऊ शकते. काही लोक केवळ थकवा, दमल्यासारखे वाटत असल्याची, पोटात वायू धरल्याची आणि गरगरत असल्याची तक्रार करू शकतात. सहसा हालचाली केल्यावर वेदना वाढते आणि आराम केल्यावर थांबते. जसे पळताना ह्रदयाच्या स्नायूंची प्राणवायूची मागणी वाढते तशीच यांच्यात हालचाली करताना वाढते. प्राणवायूचा पुरवठा व गरज यांचा मेळ बसत नसल्यामुळे ह्रदयरोगाची लक्षणे निर्माण होतात.
त्यामुळे नियमीत व्यायाम करणाऱ्यांना ह्रदयाची लक्षणे लवकर समजतात. TMT मध्येही हेच तत्त्व वापरले जाते. यामध्ये रुग्ण जॉगिंग ट्रॅकवर वेगवेगळ्या वेगाने आणि वेगवेगळ्या चढांवर धावतो आणि या तणावपूर्ण स्थितीमध्ये ईसीजीतील बदलांची नोंद घेतली जाते. लक्षणे आणि ईसीजीतील बदल हे ह्रदयाच्या आजाराचे निदर्शक आहेत आणि इकोकार्डिओग्राफीमध्ये वास्तव वेळातील आकुंचने दिसत असल्याने अधिक माहिती मिळू शकते.
सारांश हाच की आपले ह्रदय हा शरीरातील सर्वात शक्तिशाली अवयव आहे आणि त्याचे कार्य उत्कृष्ठ स्वरूपाचे आहे. आपले ह्रदय कधीही विराम घेत नाही आणि सतत महत्त्वाची पोषक तत्वे आणि प्राणवायू संपूर्ण शरीराला पोहोचवत असते.
The content is reviewed and verified by our experienced and highly specialized team of heart specialists who diagnose and treat more than 400 simple-to-complex heart conditions. These specialists dedicate a portion of their clinical time to deliver trustworthy and medically accurate content
December 3, 2023