Verified By Apollo Cardiologist October 21, 2023
2143झोप आणि ह्रदयातील दुवा म्हणजे दुतर्फा रस्ता आहे. तथापि, निरोगी ह्रदयासाठी झोप आवश्यक आहे. जर तुम्ही पुरेशी झोप घेतली नाही तर तुम्हाला ह्रदयाच्या रक्तवाहिन्यासंबंधी विकार आणि ह्रदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार होऊ शकतो, मग तुमचे वय, वजन, व्यायामाच्या आणि धूम्रपानाच्या सवयी काहीही असल्या तरीही. तुम्हाला ह्रदय विकाराची जोखीम कमी करायची असल्यास, रात्रीची चांगली झोप घेणे महत्त्वाचे आहे.
अभ्यासांतून दिसून आले आहे की कमी झोप (किंवा खूपच कमी) प्राथमिक आरोग्याच्या स्थितीमध्ये तसेच जैविक प्रक्रियांमध्ये अडथळे निर्माण करू शकते, जसे की रक्तदाब, साखरेचे चयापचय आणि दाह. हेच जास्त झोपण्यामुळेही होऊ शकते.
तेव्हा, तुमचे ह्रदय निरोगी असे किंवा नसो, रात्रीची चांगली झोप घेणे महत्त्वाचे आहे. योग्य आरामामुळे तुमच्या ह्रदयालाच मदत होत नाही तर त्यामुळे तुमची मनःस्थिती चांगली राहते, स्मरणशक्ती, विचारांची कौशल्ये, उर्जेचे स्तर आणि एकूणच आरोग्य सुधारते. पुरेशी झोप घेतल्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करण्याची तुमची क्षमताही सुधारते, नवीन कौशल्ये शिकता येतात आणि अगदी वजन नियंत्रित राहण्यासही मदत होते. झोपेमुळे तुमच्या शरीरात संप्रेरके संतुलित राहतात आणि प्रतिकार यंत्रणा निरोगी राहण्यास मदत होते. जर तुम्हाला झोपेच्या समस्या हाताळता आल्या तर तुम्हाला तुमच्या ह्रदयावरील ओझेही कमी करता येते.
ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे तुम्हाला भावनिक व अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे तुमच्या रोजच्या रात्रीच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. झोपेमुळे तुम्हाला बरे होण्यास मदत होऊ शकते. ह्रदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर झोपायला अडचण येत असल्यास, तुमची झोप सुधारण्यासाठी खालील युक्त्या मदत करू शकतात.
झोपायला जाण्यापूर्वी तासभर शांत राहा: टिव्ही पाहणे किंवा मोबाईल फोनवर किंवा संगणकावर ब्राउझिंग करणे झोपण्यापूर्वी एक तास आधी थांबवा. ते बंद करून एखादे पुस्तक वाचणे किंवा ध्यानधारणा करणे चांगले. गरम किंवा थंड पाण्याने स्नान करण्यामुळे (हवामानानुसार) शरीर शिथिल होण्यास मदत होते. झोपण्यापूर्वी हर्बल टी घ्या. याचीही मदत होते.
झोप लागेपर्यंत रेडिओ किंवा छान संगीत ऐका: जर तुम्ही जोडीदारासह झोपत असाल तर हेडफोन्स लावा.
जागे राहून अंथरुणात पडून राहण्याची वेळेची मर्यादा ठरवा जागे राहून अंथरुणात पडून राहण्याची वेळेची मर्यादा ठरवा, उदाहरणार्थ २० मिनिटे. त्यानंतरही झोप लागत नसेल तर, झोप येईपर्यंत उठून बसा आणि
गाढ झोप लागेपर्यंत असे वारंवार करा. एका रात्रीत कदाचित हे होणार नाही. काही दिवस जागे राहावे लागेल, परंतु कालांतराने जास्त सहजपणे झोप लागत असल्याचे तुमच्या लक्षात येईल.
दिवसा व्यायाम करा दिवसा नियमीत व्यायाम केल्यामुळे रात्री शांत झोप लागते. त्यामुळे दीर्घकाळ आणि लवकर झोप लागते. ह्रदयाच्या पुनर्वसनासाठी सुद्धा व्यायाम हा महत्त्वाचा घटक आहे. तो दिनक्रमाचा भाग बनला पाहिजे. केवळ निरोगी ह्रदयासाठीच नव्हे तर तुम्हाला शांत झोप लागण्यासाठीही व्यायाम मदत करतो.
संध्याकाळी कॅफेनसारखे (कॉफीतील) उत्तेजक टाळा चहा, कॉफी, साखरयुक्त पेये, सोडा आणि चॉकलेट हे उत्तेजक घटक आहेत. या उत्तेजकांचा आपल्या मेंदू व शरीरावर परिणाम होतो कारण त्यामुळे आपल्या मेंदूला चालना मिळते व तो सतर्क होतो. त्यामुळे झोप लागणे अवघड बनते. उत्तेजकांमुळे रक्तदाब, रक्तातील साखर, ह्रदयाचा दर वाढतो आणि रक्तवाहिन्या अरुंद होतात. उत्तेजक तुमच्या शरीराला सतर्क करतात आणि शिथिल होणे अवघड बनते.
झोपेच्या औषधांपासून दूर राहा झोपेच्या औषधांमुळे तात्पुरता आराम मिळतो, परंतु लोकांना सहसा त्याची सवय लागते आणि मग नेहमीच झोप लागण्यासाठी औषधांची गरज भासते. झोपेच्या औषधांच्या दुष्परिणामांमुळे जीवनाचा दर्जा प्रभावित होऊ शकतो. केवळ वैद्यकीय सल्ल्यानुसार आणि देखरेखीखालीच झोपेची औषधे घ्या.
ह्रदयाच्या शस्त्रक्रियेनंतर जीवनाशी जुळवून घेणे तणावपूर्ण असते. काही शिथिलीकरणाची तंत्रे व श्वसनाचे व्यायाम केल्यामुळे तुम्हाला तणाव व अस्वस्थतेशी जुळवून घेण्यास मदत करू शकतात आणि बरे होण्यास मदत मिळू शकते.
ह्रदयाची शस्त्रक्रिया झाल्यावर तुम्हाला झोप लागण्यात अडचण येत असल्यास, खालील स्थितींमध्ये झोपून पाहा –
बसलेल्या स्थितीत – ह्रदयाची शस्त्रक्रिया झाल्यावर तुम्हाला झोप लागण्यात अडचण येत असल्यास, खालील स्थितींमध्ये झोपून पाहा –
बसलेल्या स्थितीत – शस्त्रक्रियेनंतर, पहिले काही आठवडे, तुमच्या छातीचे हाड (स्तनाचे हाड) भरून येईपर्यंत, रिक्लायनर (आराम खुर्ची) किंवा दुमडता येणाऱ्या अंथरूणावर, डोक्याकडचा भाग उंच करून बसलेल्या स्थितीत झोपल्यामुळे आराम मिळू शकतो. मानेभोवती अडकवायच्या उशीने मान आणि मणक्याला आधार द्या. तथापि, बसलेल्या स्थितीत निरंतर, गाढ झोप लागत नाही. त्यामुळे, दीर्घकाळ या स्थितीची शिफारस केली जात नाही. शस्त्रक्रियेनंतर तुमचे डॉक्टर तुम्हाला याबाबत सल्ला देऊ शकतात.
पाठीवर: ह्रदयाच्या शस्त्रक्रियेनंतर तुम्ही जसे बरे होऊ लागता तसे तुमचे डॉक्टर तुम्हाला तुमच्या छाती व ह्रदयावर ताण येऊ न देण्याचा सल्ला देतात. पाठीवर झोपल्यामुळे, तुमचे डोके, मान आणि पाठीचा कणा
एका रेषेत येतात आणि त्यामुळे वेदना व ताण कमी होतात. जर अंथरुणातून उठणे आणि/किंवा अंथरुणात वळणे अवघड जात असेल तर आधारासाठी उशा लावाव्या.
उजव्या कुशीवर – ज्या लोकांना पोटावर पालथे झोपण्याची सवय असते ते कुशीवर झोपू शकतात, परंतु पोटावर झोपू नये. कुशीवर झोपणे जरी स्वीकारलेली वस्तुस्थिती असली तरी, अनेक संशोधन अभ्यासांत म्हणले आहे की ह्रदयाच्या समस्या असलेल्या लोकांना डाव्या कुशीवर झोपल्यावर श्वसनाच्या समस्या येतात आणि छातीत दुखते. त्यामुळे, ह्रदयाच्या शस्त्रक्रियेनंतर उजव्या कुशीवर झोपण्याचा सल्ला दिला जातो.
ह्रदयाची शस्त्रक्रिया झाल्यावर काही महिन्यांमध्ये तुम्हाला सामान्य झोप लागू लागेल. इतर काही बदल आढळले किंवा जर झोप कमी लागण्याचा तुमच्या जीवनावर परिणाम होत असेल तर, तुमच्या डॉक्टरांना किंवा आरोग्यसेवा प्रदाताला कॉल करा.
तुम्हाला ह्रदयविकाराचा झटका आला असो किंवा ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली असो, बरे होण्यासाठी तुम्हाला चांगली शांत झोप लागणे महत्त्वाचे आहे. झोप लागण्यात अडचण येत असेल किंवा त्याचा तुमच्या जीवनाच्या दर्जावर परिणाम होत असेल तर, तुमच्या डॉक्टरांना किंवा आरोग्यसेवा प्रदाताला कॉल करा. तुम्ही वापरत असलेल्या सर्व औषधांबाबत डॉक्टरांना सांगा.
लक्षणे माहीत असतील आणि जीवनशैलीत बदल केले तर त्यांची नक्कीच मदत होते. आजच कृती करा! तुमचे ह्रदय निरोगी ठेवण्यासाठी आमच्या सर्वसमावेशक सुदृढ ह्रदय कार्यक्रमामध्ये नावनोंदणी करा.
The content is reviewed and verified by our experienced and highly specialized team of heart specialists who diagnose and treat more than 400 simple-to-complex heart conditions. These specialists dedicate a portion of their clinical time to deliver trustworthy and medically accurate content
December 3, 2023