Verified By October 21, 2023
2198भाजून काढणाऱ्या उन्हाळ्यापासून आपली सुटका करण्यासाठी लवकरच पाऊस येईल. तापमानातील बदल जरी हवाहवासा वाटत असला तरी, पाऊस येताना काही त्रासही घेऊन येतो. त्यामुळे अनेकदा फ्लू, खोकला, सर्दी, पचन बिघडणे यांसारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. तसेच पावसामुळे अचानक माशा आणि डासांचे प्रमाण वाढून आपल्याला मलेरिया, कावीळ, डेंग्यू, अतिसार, टायफॉइड, कॉलरा आणि लेप्टोस्पिरोसिस इत्यादींसारखे आजार होण्याची शक्यता वाढते.
तेव्हा आरोग्याच्या या सूचनांचे पालन करून पावसाळ्यात सतर्क राहा व काळजी घ्या.
अंगभर कपडे घालून शिवाय शरीराच्या उघड्या भागावर डास न चावण्यासाठीचे क्रीम लावणेही चांगले असते.
पाण्याच्या टाक्या आणि इतर जलस्रोतांपासून डासांना दूर ठेवणे हा डास नियंत्रित ठेवण्याचा योग्य दृष्टिकोन आहे. एवढेच नाही तर, फुटके डबे, मडकी यांमध्ये तसेच पाण्याच्या टाक्यांखाली किंवा नळांखाली पाणी साठू देऊ नये कारण येथेच डास अंडी घालतात. बहुतांश डासांच्या जाती त्यांना अंडी घालण्यास योग्य अशा जागांच्या आसपास राहतात.
तथापि, तुम्ही पीत असलेल्या पाण्याबाबत अतिशय काळजी घ्या कारण पावसाळ्यातील बहुतांश आजार हे पाण्यामुळे होतात. धोकादायक जंतू मारण्यासाठी आणि इतर अशुद्ध घटक काढून टाकण्यासाठी तुम्ही पाणी उकळून पिऊ शकता. स्वच्छ उकळलेले पाणी प्या आणि शक्य असल्यास बाटलीबंद पाणी प्या.
तेव्हा, पौष्टिक आहार आणि निरोगी जीवनशैलीसह हा पावसाळा तुमच्यासाठी आणि तुमच्या आप्तांसाठी खरोखरच जादुई बनवा.