Verified By Apollo Cardiologist September 9, 2023
3381विहंगावलोकन
ह्रदय अवरोध किंवा एव्ही बंडल ब्लॉक म्हणजे ह्रदयाच्या विद्युत प्रणालीमध्ये अडथळा येणे. ह्रदय अवरोधामध्ये, तुमच्या ह्रदयाचे अनियमीत आणि अतिशय संथ ठोके पडतात, यामध्ये संभाव्यतः ह्रदय एकावेळी साधारण २० सेकंद थांबते. तुमच्या ह्रदयाचे ठोके पडण्यासाठी जे विद्युत आवेग प्रवास करतात त्यांच्या मार्गात अडथळा, अवरोध निर्माण होणे किंवा त्यांना पुढे जाण्यास विलंब होणे यामुळे हे घडू शकते. ह्रदयाच्या स्नायूला किंवा ह्रदयाच्या झडपांना इजा झाल्यामुळे किंवा नुकसान पोहोचल्यामुळे हे होऊ शकते. थेट ह्रदय अवरोधासाठी तशी उपचारांची गरज नसते परंतु त्यामागील संबंधित आरोग्याच्या स्थितींसाठी उपचार आवश्यक असतात.
सहसा, ह्रदय अवरोधामुळे छातीत धडधडते, डोके हलके होते आणि भोवळ येते. छातीत दुखूही शकते. याच्या तीव्रतेनुसार, ह्रदय अवरोध धोकादायक असू शकतो. उदाहरणार्थ, पूर्ण ह्रदय अवरोधामुळे (तिसऱ्या स्थितीतील ह्रदय अवरोध) ह्रदय बंद पडण्यासारख्या विद्यमान स्थिती आणखी बिघडू शकतात. त्यामुळे व्यक्ती बेशुद्ध पडू शकते आणि अगदी अचानक कार्डिऍक अरेस्ट (हृदयविकाराचा झटका) सुद्धा होऊ शकते.
ह्रदय अवरोध म्हणजे काय?
ह्रदय अवरोध म्हणजे ह्रदयाच्या विद्युत आवेगांमध्ये अडथळा. निरोगी व्यक्तीचे ह्रदय मिनिटाला ६०-१०० वेळा धडधडते. ह्रदयाचा ठोका म्हणजे ह्रदयाच्या स्नायूचे एक आकुंचन ज्यामुळे शरीराच्या इतर भागामध्ये रक्त ढकलले जाते. सहसा, ह्रदयाच्या स्नायूची आकुंचने विद्युत आवेगांनी नियंत्रित केली जातात. हे आवेग ह्रदयाच्या वरच्या कप्प्यांतून किंवा कर्णिकेतून डाव्या कप्प्यात किंवा जवनिकेमध्ये प्रवास करतात.
विद्युत आवेगांना विलंब होतो किंवा ते आंशिकरित्या थांबतात आणि तुमच्या ह्रदयाच्या नियमीत ठोक्यांना प्रतिबंध करतात तेव्हा आंशिक ह्रदय अवरोध होतो. जेव्हा विद्युत संकेतांना पूर्ण अडथळा येतो किंवा ते पूर्ण थांबतात तेव्हा संपूर्ण ह्रदय अवरोध होतो. मिनिटाला साधारण ४० वेळा जेव्हा तुमच्या ह्रदयाचे ठोके थांबतात तेव्हा हे घडू शकते. सेकंदाच्या एक अंशापुरता जरी आवेगात बदल झाला तर त्यामुळे ह्रदय अवरोध होऊ शकतो.
कधीकधी, ह्रदय अवरोधामुळे आपल्या अभिसरण संस्थेमधून रक्त योग्यप्रकारे पाठवणे ह्रदयाला अवघड बनू शकते. यामुळे आपले स्नायू आणि अवयवांना (मेंदूसह) होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि त्यांच्या कार्यात अडथळा येतो.
ह्रदय अवरोधाचे प्रकार
ह्रदय अवरोधाचे तीन प्रकार आहेत, ते म्हणजे:
संपूर्ण ह्रदय अवरोध
शस्त्रक्रियेदरम्यान एट्रियोव्हेन्ट्रिकुलर नोडला नुकसान पोहोचल्यामुळे (एव्ही नोड) संपूर्ण ह्रदय अवरोध होऊ शकतो. परंतु, कधीकधी शस्त्रक्रियेविना तो उत्स्फुर्तपणेही होऊ शकतो. ह्रदयाचा सामान्य ताल किंवा दर पुनर्स्थापित करण्यासाठी, कृत्रिम पेसमेकर बसवावा लागतो.
लक्षणे
संपूर्ण ह्रदय अवरोधच्या खुणा आणि लक्षणे पुढील प्रमाणे असतात:
वरील सर्व खुणा आणि लक्षणे जीवघेणी असू शकतात. यांपैकी कोणतीही लक्षणे जाणवल्यास, कृपया रुग्णवाहिकेला किंवा तुमच्या स्थानिक आपात्कालीन सेवा प्रदाताला कॉल करा.
कारणे
संपूर्ण ह्रदय अवरोध असलेल्या अनेक लोकांना आधीच अंतर्निहित ह्रदयाच्या स्थितीचा त्रास असतो, जसे की कार्डिओमायोपथी, जन्मजात ह्रदयरोग किंवा ह्रदय रोहिणीचा विकार. आपल्या ह्रदयातील विद्युत मार्गांचेही वय वाढत असल्यामुळे, वाढते वय हे सुद्धा एक कारण असू शकते. काही औषधोपचार आणि इलेक्ट्रोलाईटमधील असंतुलन यामुळेही संपूर्ण ह्रदय अवरोध होऊ शकतो.
निदान
तुमची प्राथमिक काळजी घेणारे डॉक्टर ह्रदयाच्या संपूर्ण मूल्यमापनासाठी तुम्हाला ह्रदय तज्ज्ञांकडे (कार्डिऑलॉजिस्ट) पाठवू शकतात. तुम्ही आधी केलेल्या ह्रदयाच्या चाचण्यांसह तुमच्या मागील वैद्यकीय नोंदी पाहून कार्डिऑलॉजिस्ट सुरुवात करू शकतात.
तुमचे ह्रदय तज्ज्ञ तुम्हाला तुमच्या सर्वसाधारण आरोग्याबाबत, आहार, हालचालींचा स्तर व कौटुंबिक वैद्यकीय इतिहासाबद्दल प्रश्न विचारू शकतात. दुकानात सहज मिळणारी किंवा प्रिस्क्रिप्शनने मिळणारी कोणती औषधे तुम्ही घेता का आणि तुम्ही मद्यपान करता का किंवा अंमली पदार्थांचे सेवन किंवा धूम्रपान करता का याबाबतही तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला विचारू शकतात.
तुमची एक सर्वसमावेशक शारीरिक तपासणी केली जाते ज्यामध्ये तुमचे ह्रदय तज्ज्ञ तुमच्या ह्रदयाचे ठोके ऐकतात. तसेच तुमच्या ह्रदयाचा दर किंवा ह्रदयाचा ताल मोजण्यासाठी ते तुमची नाडी तपासतात. पावलांवर किंवा पायांमध्ये द्रव धारणा आहे का हे सुद्धा तज्ज्ञ तपासू शकतात.
इलेक्ट्रोकार्डिओग्राम (ईसीजी किंवा इकेजी) नावाच्या चाचणीने ह्रदय अवरोधाचे निदान होऊ शकते. ईसीजी तुमच्या ह्रदयाच्या विद्युत हालचालींची प्रभावीपणे नोंद करतो. या चाचणीतून एक असा आलेख तयार होतो ज्यामध्ये ह्रदयाचा ताल आणि ह्रदयाचा दर दिसतो. यामध्ये तुमच्या ह्रदयातून विद्युत संकेत पुढे जात असतानाची वेळही नोंदवली जाते.
जर तुमच्या डॉक्टरांनी दीर्घकाळ विद्युत संकेत तपासण्याचे ठरवले तर ते तुम्हाला २४ ते ४८ तासांसाठी हॉल्टर मॉनिटर नावाचे एक लहान, पोर्टेबल, ईसीजी मशीन गळ्यात घालण्यास सांगू शकतात. हॉल्टर मॉनिटरमुळे तुम्ही तुमच्या दैनंदिन हालचाली करत असताना तुमच्या ह्रदयाच्या विद्युत हालचालींची निरंतर नोंद होत राहते. आरामाच्या स्थितीमध्ये काही सेकंदांमध्ये घेतलेल्या ईसीजीमध्ये न दिसलेल्या समस्या शोधण्यास हा मॉनिटर मदत करू शकतो.
उपचार
संपूर्ण ह्रदय अवरोध ही वैद्यकीय आपात्कालीन परिस्थिती आहे. तुमच्या समस्येच्या तीव्रतेनुसार, ह्रदय तज्ज्ञ औषधोपचार किंवा पेसमेकर बसवून घेण्याची शिफारस करू शकतात.
औषधे
डॉक्टर काही एऱ्हिदमिआरोधी (ह्रदयाच्या लयीतील असामान्यता रोखण्यासाठी) औषधे विहित करू शकतात, ज्यामुळे तुमच्या ह्रदयाचे विद्युत संकेत बदलून ह्रदयाच्या विद्युत प्रणालीतील अडथळ्यांना प्रतिबंध करण्यास मदत होते.
पेसमेकर
तीव्रतेनुसार, तुमचे डॉक्टर पेसमेकर नावाचे एक लहानसे उपकरण तुमच्या छातीत बसवून घेण्याची शिफारस करू शकतात. हे लहानसे उपकरण बसवण्यासाठी किरकोळ शस्त्रक्रिया केली जाते. पेसमेकरला दोन वायर असतात ज्या तुमच्या ह्रदयाच्या उजव्या बाजूला जोडल्या जातात. पेसमेकर तुमच्या ह्रदयासाठी बॅकअप विद्युत प्रणालीचे काम करतो. तुमचे ह्रदय थांबले किंवा संथ झाले तर त्याला पुन्हा सामान्य दराने चालू राहण्याचे पेसमेकर स्मरण देतो.
निष्कर्ष
संपूर्ण ह्रदय अवरोध ही एक गंभीर वैद्यकीय आपात्कालीन स्थिती आहे आणि त्यावर योग्यवेळी उपचार करून घेणे महत्त्वाचे आहे. तसेच, संपूर्ण ह्रदय अवरोधावर उपचार करण्यासाठी ह्रदय तज्ज्ञांची आवश्यकता असल्यामुळे, तुमचे डॉक्टर दर्जेदार प्रशिक्षण घेतलेले आणि ह्रदय अवरोधांवर उपचार करण्याचा अनुभव असलेले आहेत का याची माहिती घ्या. तुमची वैद्यकीय स्थिती जितकी जास्त गुंतागुंतीची असेल, तितके हे जास्त महत्त्वाचे ठरते.
लक्षणे माहीत असतील आणि जीवनशैलीत बदल केले तर त्यांची नक्कीच मदत होते. आजच कृती करा! तुमचे ह्रदय निरोगी ठेवण्यासाठी आमच्या सर्वसमावेशक सुदृढ ह्रदय कार्यक्रमामध्ये नावनोंदणी करा.
The content is reviewed and verified by our experienced and highly specialized team of heart specialists who diagnose and treat more than 400 simple-to-complex heart conditions. These specialists dedicate a portion of their clinical time to deliver trustworthy and medically accurate content
December 3, 2023