Verified By Apollo General Physician July 28, 2023
40673छातीत दुखणे ही गंभीर समस्या आहे का?ते ह्रदयविकाराच्या झटक्यासारखे गंभीर कशामुळे होते?छातीतील जळजळल्याची संवेदना जी कमी होत नाही तर उलट वाढतच जात असल्यासारखी वाटते.हा ह्रदयविकाराचा झटका असू शकतो का दुसरे काहीतरी?अनेक लोक आणि डॉक्टरांना दररोज सामना करावा लागणारा हा एक निराशाजनक प्रश्न आहे.तुम्हाला किंवा तुमच्या कोआ आप्तांना छातीत दुखत असेल तर त्याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी वाचा आणि लगेच मदत मिळवा.
ह्रदयविकाराच्या झटक्या व्यतिरिक्त, न्युमोनिया, स्वादुपिंडाचा दाह किंवा भिती यांसारख्या इतर गोष्टांमुळेही छातीत दुखू शकते.
विविध रुग्णालयांच्या आपात्कालीन विभागातील छातीत दुखत असल्याचे सांगणाऱ्या बहुतांश रुग्णांना ह्रदयविकाराचा झटका आलेला नसतो.खरे तर, काही जणांना (सुमारे २०%) ह्रदयविकाराचा झटका, अस्थिर अँजायना किंवा ह्रदयविकाराच्या झटक्याची चेतावणीची खूण यांचे निदान झालेले असते; तर इतर काही जणांना जवनिकेचे विच्छेदन (जवनिकेचा आतील स्तर फाटणे), पल्मनरी एम्बोलिझम (फुफ्फुसांमध्ये रक्ताची गुठळी) यांसारखे त्रास असतात.काहींना अँजायनाचा त्रास होऊ शकतो. भावनिक तणावामध्ये किंवा शारीरिक श्रम केले असताना जेव्हा तुमच्या ह्रदयाच्या काही भागाला पुरेसे ऑक्सिजनयुक्त रक्त मिळत नाही तेव्हा असे छातीत दुखते.एवढेच नाही तर, छातीत दुखत असल्यामुळे आपात्कालीन खोलीमध्ये दाखल होणाऱ्या बहुतांश रुग्णांची स्थिती ह्रदय किंवा रोहिण्यांशी संबंधित नसते.
ह्रदयविकाराच्या झटक्यातील एक पेच म्हणजे याची लक्षणे नेहमीच सारखी नसतात.वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे अनुभव येतात.काहींच्या छातीत दुखते तर काहींचा जबडा किंवा पाठ दुखते.तर इतरांना मळमळल्याची भावना येते, धाप लागते किंवा प्रचंड थकवा येतो.
सुस्पष्ट ह्रदयविकाराच्या झटक्याच्या संभाव्य लक्षणांपैकी छातीत दुखणे हे एक आहे.खाली दिलेल्यांपैकी एक किंवा जास्त लक्षणे तुम्हाला स्वतःमध्ये किंवा इतर कोणामध्ये दिसल्यास, तुमच्या स्थानिक वैद्यकीय आपात्कालीन क्रमांकावर कॉल करा आणि त्वरित वैद्यकीय मदत घ्या.
तुमच्या लक्षणांचे विवरण ऐकल्यानंतर कोणाला ह्रदयविकाराचा झटका आला आहे आणि कोणाला नाही हे ठरवण्यासाठी डॉक्टर अनेक प्रश्न विचारतात. हे ठरवताना तुमच्या ह्रदयाच्या आराखड्याबरोबरच डॉक्टर कार्डिऍक ट्रोपोनिन नावाच्या रक्त चाचणीचे आणि इलेक्ट्रोकार्डीओग्राम (ECG) चाचणीचे निकालही वापरतात.परंतु, कधीकधी या चाचण्यांमध्ये त्वरित असामान्यता दिसत नाही.त्यामुळे, तुमचा वैद्यकीय इतिहास आणि तपशीलवार वर्णन डॉक्टरांना सांगणे अतिशय महत्त्वाचे असते आणि त्यानुसारच तुमच्या उपचारांचे प्रारंभीचे टप्पे ठरतात.
स्पष्ट निदान करण्यासाठी तुम्हाला काय त्रास होतो आहे याबाबत डॉक्टर काही नेहमीचे प्रश्न विचारू शकतात.यामध्ये समावेश होतो:
वरील प्रश्नांची योग्य उत्तरे दिल्यामुळे डॉक्टरांना समस्येबाबत स्पष्ट निदान करण्यास मदत होते.
ह्रदयविकाराचा झटका असू शकतो | ह्रदयविकाराचा झटका नसू शकतो |
---|---|
दबावाची संवेदना, जळजळ, आवळल्याची भावना, घट्टपणा किंवा वेदना | खोकल्यावर सुरी टोचल्यासारखी तीव्र वेदना किंवा श्वास घेणे जड जामे |
जबडा, डावा हात, मान किंवा पाठीकडे जाणारी वेदना | केवळ एकाच ठिकाणी असलेली वेदना |
भावनिक तणाव किंवा शारीरिक श्रमांनंतर किंवा आराम करताना सुद्धा येणारा दबाव किंवा वेदना | छाती दाबल्यावर किंवा शरीराच्या हालचाली केल्यावर होणारी वेदना |
काही मिनिटांमध्ये वेदना वाढत जाणे | अचानक भोसकल्यासारखी वेदना होणे व केवळ काही सेकंद टिकणे |
दबाव किंवा वेदना व त्यासह अचानक मळमळणे, थंड घाम सुटणे किंवा श्वास घेण्यात अडचण येणे | इतर लक्षणे न दाखवता अनेक तास किंवा दिवस चालू राहणारी वेदना |
छातीच्या मध्यभागी निरंतर वेदना | स्पष्टपणे शरीराच्या एका किंवा दुसऱ्या बाजूला असलेली वेदना |
गुडघे दुखी किंवा कंबरदुखी प्रमाणे छातीत दुखण्याकडे दुर्लक्ष करता येत नाही किंवा खांदे उडवून उद्या बघू असे म्हणता येत नाही.याचे निदान व उपचार घरी करता येत नाहीत.जर तुमच्या छातीत दुखत असेल तर, त्वरीत डॉक्टरांना दाखवा.छाती, डावा हात, पाठीचा वरचा भाग,जबडा यांमध्ये अस्वस्थता किंवा वेदना होत असतील, अचानक मळमळायला लागले, उलट्या होऊ लागल्या, थंड घाम सुटला तर त्वरीत डॉक्टरांना किंवा तुमच्या स्थानिक आपात्कालीन केंद्राला कॉल करून आपात्कालीन वैद्यकीय संघ असलेली रुग्णवाहिका बोलवा.
छातीत दुखणे ही गंभीर स्थिती आहे.चेतावनीच्या खुणांकडे दुर्लक्ष करू नका.जर तुम्हाला वाटत असेल की ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे छातीत दुखते आहे तर त्वरित कृती करा.जितक्या लवकर तुम्ही छातीत दुखणे तपासून घ्याल, तितक्या लवकर कोणत्याही कायमस्वरुपी नुकसानापासून तुम्ही तुमच्या ह्रदयाचे संरक्षण करू शकाल.
लक्षणे माहीत असतील आणि जीवनशैलीत बदल केले तर त्यांची नक्कीच मदत होते.आजच कृती करा!तुमचे ह्रदय निरोगी ठेवण्यासाठी आमच्या सर्वसमावेशक सुदृढ ह्रदय कार्यक्रमामध्ये नावनोंदणी करा.
Our expert general medicine specialists verify the clinical accuracy of the content to deliver the most trusted source of information, making the management of health an empowering experience.