Verified By Apollo Hepatologist October 21, 2023
2204वैद्यकीय शास्त्र आणि संबंधित क्षेत्रातील प्रगतीने अवयव दान आणि प्रत्यारोपणाच्या क्षेत्रामध्ये जलद गतीने हालचाली होऊ लागल्या आहेत. यकृत प्रत्यारोपणाच्या बाबतीत हे अधिक स्पष्टपणे दिसत आहे, कारण संपूर्ण वर्षभर, जगभरातील हजारो रुग्ण यशस्वी यकृत प्रत्यारोपण करून घेत आहेत. रुग्णास आधार देण्यासाठीच्या आवश्यक कृती रोगग्रस्त व्यक्ती जेव्हा उचितपणे करू शकत नाही तेव्हा यकृत प्रत्यारोपण आवश्यक ठऱते.
यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता निर्माण होण्यामागे, यकृत सिऱ्हॉसिस हे सर्वात सामान्य कारण आहे. जुनाट यकृतशोथ (हेपिटायटीस) बी आणि सी; पित्त वाहिनीचे विकार; आनुवांशिक रोग; स्वयंप्रतिरोधक यकृत विकार; प्राथमिक यकृताचा कर्करोग; मद्यपानामुळे होणारे यकृताचे विकार आणि चरबीयुक्त यकृताचे विकार हे यशस्वी यकृत प्रत्यारोपणाने बरे होऊ शकतील अशा इतर काही स्थिती आहेत.
यकृत प्रत्यारोपण यशस्वी करण्याच्या डॉक्टरांच्या क्षमतेमुळे मृत्यूचे प्रमाण खूपच कमी झाले असले तरी, ह्याची नकारात्मक बाजू म्हणजे अवयवदान आणि प्रत्यारोपणासंदर्भात अनेक नैतिक समस्यांमध्ये वाढ झाली आहे. अवयव दानाच्या क्षेत्रात तीन सर्वात सामान्य नैतिक समस्या समाविष्ट आहेत- उपलब्ध करुन देण्याच्या समस्या, वाटपाच्या समस्या आणि परवडण्याबाबत समस्या. जेव्हा आपण आणखी सखोल जातो तेव्हा हा मुद्दा आणखी गुंतागुंतीचा होतो- कारण यातील प्रत्येक नैतिक कोडे हे दुसर्या समस्येत गुंतलेले असते. कोणीही एकतर्फी दृष्टिकोन बाळगू शकत नाही आणि यामधील प्रत्येक समस्येस इतरांच्या संदर्भासह संबोधित करणे आवश्यक असते.
आपल्या आयुष्यातील अनेक इतर गोष्टींप्रमाणे, मरणानंतर किंवा जीवित असताना अवयव दान करणारे दाता हे मागणीपेक्षा कमी आहेत – म्हणून प्रत्येक वेळी यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असल्यास एखाद्याने यकृत कुठून घ्यावे? या प्रश्नास सामोरे जाणे आवश्यक आहे. मरणानंतर किंवा जीवित असताना अवयव दान करणाऱ्यांची संख्या आवश्यकतेपेक्षा खूपच कमी आहेत.
अवयवदान प्रक्रिया अनेक कारणांसाठी तुलनात्मकरीत्या अकार्यक्षम आहे. मेंदूच्या मृत्यूचे निकष ओळखण्यात रोगचिकित्सक अयशस्वी होत असल्यामुळे अवयव गमावले जातात. मेंदूचा मृत्यू जाहीर करण्यासंदर्भातील कायद्यांचे स्पष्टीकरण देण्यासाठी आरोग्य सेवा देणाऱ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम उपयुक्त ठरू शकतात. देणगीसाठीच्या विनंत्या अनेकदा अननुभवी कर्मचारी हाताळतात, हा संमती दर कमी होण्याशी संबंधित घटक आहे.
त्यामुळे, आपण पाहतो की एखादा अवयव उपलब्ध करणे सोपे नाही किंवा तशी कुठली सरळ प्रणाली देखील उपलब्ध नसते. संमती रोखण्यासाठी देणगीदाराची स्वतःची वैध कारणे असतातच, पण संमती व्यक्त करणाऱ्यांचा देखील प्रक्रियात्मक कारणांमुळे नेहमीच प्रभावी वापर केला जात नाही.
वाटपाच्या बाबतीत, प्रत्येकाला जगण्याची वाजवी संधी मिळवून देणारे कोणतेही तंत्र वा पद्धत अस्तित्वात नाही. ‘आणिबाणी, ‘गरज, आणि ‘तातडी’ शासित करण्यात येणाऱ्या समस्या बर्याचदा व्यक्तिनिष्ठ घटकांनी
घेरलेल्या असतात. प्रत्यारोपणाच्या प्राप्तकर्त्याला इतरांपेक्षा वाढीव फायदा मिळायला हवा परंतु या निष्कर्षापर्यंत येण्याबाबत बोलणे सोपे असले तरी कृती अवघड असते.
अवयव वाटपाच्या सर्व निर्णयांमध्ये दोन मुख्य स्पर्धात्मक तत्त्वांचा विचार केला जातो. ती म्हणजे न्याय आणि उपयुक्तता. अवयवांचे वाटप करताना एक प्रमुख दुविधा समोर येते: अवयवांचा कुशलपणे वाटप करण्यासाठी तयार केलेली कोणत्याही व्यवस्थेकडे अन्यायकारक किंवा अयोग्य म्हणून पाहिले जाऊ शकते. जास्तीत जास्त उपयोगितेचा समर्थक मर्यादित स्रोतांमध्ये जास्तीत जास्त चांगले काम करण्याचा प्रयत्न करतो. तर, वितरणाचा आधार म्हणून न्यायाची वकिली करण्यारे त्यांना न्याय्य वाटणाऱ्या वितरणाच्या पद्धतीकडे पाहात असतात. त्यांच्या मते, न्याय म्हणजे सर्वात वाईट स्थितीत असणार्यांना लाभ देणे. रोगचिकित्सक उपयुक्ततेला प्राधान्य देतात, परंतु शासने मात्र सहसा न्याय आणि योग्यतेची बाजू घेतात.
अखेरीस, उचित प्राप्तकर्त्यास अवयव उपलब्ध करुन देऊन त्याचे वाटप झाल्यावर त्याला ते परवडते का हा प्रश्न समोर येतो. कोणत्याही अवयवाच्या प्रत्यारोपणाच्या प्रक्रिया या महागड्या असतात आणि प्रचंड खर्चिक असू शकतात. श्रीमंत आणि पैसेवाल्यांना (समाजातील उच्च वर्ग) त्या परवडू शकतीलही, पण या तुलनेत गरीब असणाऱ्या लोकांसाठी हा पर्याय सहसा उपलब्ध नसतो. पैशाच्या अभावी एखाद्या प्राप्तकर्त्याला किंवा आजारी रूग्णाला प्रत्यारोपणाची परवानगी नाकारली जावी का? आपल्या समकालीन सुसंस्कृत शासनांना ही नैतिक कोंडी नक्कीच सोडवता यायला हवी.
परंतु, एकमताने मान्यता देण्यासाठी कोणतेही निश्चित सूत्र किंवा कार्यपद्धती अस्तित्वात नाही कारण ज्यांना परवडेल त्यांना स्रोत उपलब्ध असूनही प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेस नकार दिला गेल्याचा राग येऊ शकतो.
वैद्यकीय शास्त्राने आपल्याला जटील वैद्यकीय परिस्थितीवर यशस्वी उपाय शोधण्यात मदत केली आहेत, तरी अनेक नैतिक आव्हाने आहेत ज्यांसाठी माणुसकीच्या दृष्टिकोनाची जास्त आवश्यकता आहे.
To be your most trusted source of clinical information, our expert Hepatologists take time out from their busy schedule to medically review and verify the clinical accuracy of the content