Home vernacular Cardiac Family History

      Cardiac Family History

      Cardiology Image 1 Verified By Apollo Cardiologist July 28, 2020

      2567
      Cardiac Family History

      कौटुंबिक इतिहास आणि हृदयविकार

      हृदय रोहिणीचा विकार (कार्डिओव्हास्क्युलर आजार) हा भारतातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. हृदयरोगाच्या जोखमीचे घटक कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, परंतु एक क्षेत्र ज्याला काही करता येऊ शकत नाही ते म्हणजे, कुटुंबाचा वैद्यकीय इतिहास. होय, ह्रदयविकार आपल्याला जनुकांशी जोडला जाऊ शकतो आणि कौटुंबिक इतिहास हा हृदयविकाराबाबत एक प्रमुख, परंतु अतिशय गुंतागुंतीचा जोखीम घटक कायम राहतो.
      कुटुंबाचा हृदयाबाबतचा विपरित इतिहास हा पुरुषांमध्ये साधारण वयाच्या ५५ वर्षांपूर्वी आणि स्त्रियांमध्ये ६५ वर्षांपूर्वी हृदयविकार झालेली भावंडे अथवा पालक असलेल्यांमध्ये असल्यास अतीविपरित हृदयविकाराच्या इतिहासाचे निदान होते. असा इतिहास व्यक्तीतील हृदयविकाराचा धोका वाढवितो आणि अधिक आक्रमक प्रतिबंधात्मक उपाय करण्याचा इशारा देतो.
      अनुवांशिक घटकांमुळे किंवा सामायिक जीवनशैलींमुळे धोका असू शकतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलमधील असामान्यता आणि स्थूलत्व हे ह्रदयविकाराचे मुख्य जोखीम घटक देखील कुटुंबांमध्ये असतात आणि त्यामुळे धोका वाढू शकतो. सतत फास्ट फूडचे सेवन, तंबाखू चघळणे आणि/किंवा धूम्रपान करणे हे आणखी काही जोखीम घटक आहेत. हे जरी कुटुंबाशी काटेकोरपणे संबंधित नसले तरी याची सामाजिक मुळे आहेत. उदाहरणार्थ, धूम्रपान करणार्‍यांच्या किंवा मोठ्या प्रमाणात फास्ट-फूडचे सेवन करणाऱ्या कुटुंबातील मुलांवर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. खाण्यापिण्याच्या सवयी, तंबाखू चघळणे किंवा धूम्रपान करणे इतर सामायिक जीवनशैलींसह बदलू शकतात, परंतु आपल्याला आपल्या जनुकांचा सामना करावाच लागतो.

      आपण धोका असल्याचे कसे ओळखू शकतो?

      काही वैद्यकीय चाचण्या केल्यास अधिक अचूक निदानामुळे आपला धोका ओळखण्यास मदत होते. हृदयरोगाच्या आपल्या अनुवांशिक जोखमीचे वर्गीकरण करणारी डीएनए चाचणी आपल्याला गुणांक (कमी, मध्यम किंवा उच्च) देऊ शकते. तथापि, आपण अनुवंशिक हृदय रोगाची शिकार असू किंवा नाही हे निर्धारित होण्यात निरोगी हृदयाचे पॅकेज म्हणून ओळखल्या जाणार्‍या सर्वसमावेशक अशा हृदय तपासणीमुळे मदत होते.

      तर मग, त्याबद्दल काय करता येऊ शकते?

      आपल्या कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास आहे की नाही हे समजून घेणे हा आपल्या अनुवंशिकतेने आलेल्या जोखमीचा निदर्शक असू शकतो. कुटुंबाचा विपरित इतिहास आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्या रक्ताच्या नातेवाइकांमध्ये तपासणी करणे (जसे वडील, आई, भावंडे) ही पहिली पायरी असते. यांपैकी कोणा पुरूषाला वयाच्या ५५ वर्षांपूर्वी किंवा कोणा स्त्रिला ६५ वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता का, पक्षाघात (स्ट्रोक) झाला होता का किंवा मृत्यू आला होता का? आपण आपल्या आजी आजोबांबाबत सुद्धा हे तपासू शकतो, त्यांना कुणाला कमी वयात असताना हृदयविकार होता का. आपल्या कुटुंबाचे घरातील वातावरण आणि सामायिक जीवनशैली देखील आपली जोखीम वाढवू शकते.

      पंरतु, प्रतिबंधात्मक जीवनशैली आणि आरोग्य-तपासण्या करणे हा प्रतिकूल कौटुंबिक इतिहासाबाबत योग्य दृष्टीकोन असू शकतो. जीवनशैलीच्या उपायांमध्ये पुढील गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

      • नियमित व्यायाम: आपले हृदय मजबूत करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे व्यायाम करणे. नियमित मध्यम तीव्रतेचे हृदयाचे आणि शक्तीचे व्यायाम आणि प्रशिक्षणामुळे रक्ताभिसरण आणि आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारते. त्यामुळे योग्य वजन टिकवून ठेवण्यास देखील मदत होते. मध्यम तीव्रतेचे एरोबिक व्यायाम जसे सायकलिंग, जॉगिंग, पोहोणे, ठराविक कालावधीने प्रतिकारशक्तीचे प्रशिक्षण देणारे खेळ हृदयरोगाचा धोका कमी करण्यास खूप मदत करू शकतात.
      • तंबाखू टाळणे: कर्करोग होण्यासाठी सर्वात धोकादायक घटक असलेल्या धूम्रपान आणि/किंवा तंबाखू चघळण्यामुळे ह्रदयविकारही वाढू शकतो, जसे हृदय विकाराचा झटका, परिधीय धमन्यांचा विकार (पेरिफेरल आर्टरियल डिसिज), पक्षाघात हा धोका वाढतो. आपल्या ह्रदयाला व शरीराच्या इतर अवयवांना रक्त पोहोचविणाऱ्या रोहिण्यांवर आणि पर्यायाने शरीराच्या इतर अवयवांवर धूम्रपानाचा परिणाम होतो. आपल्या रक्तातील प्राणवायूचे (ऑक्सिजनचे) प्रमाण कमी होऊन आपल्या धमन्यांच्या भिंतींना नुकसान पोहोचते. धुम्रपानामुळे आपले रक्त ‘अधिक चिकट’ होते, ज्यामुळे आपल्या रक्तातील पेशींची एकत्र गाठ तयार होते आणि मग रोहिण्यांतून होणारा रक्तप्रवाह मंदावतो आणि गुठळ्या तयार होतात. या अडथळ्यांमुळे ह्रदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात होऊ शकतो. तेव्हा जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर आजच सोडा!
      • शरीराचे सामान्य वजन: जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे हृदय रोगाबरोबरच मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल यासारख्या आरोग्याच्या अनेक स्थितींचा धोका वाढतो. विशेषत: शरीराच्या मध्यभागावर अधिक वजन वाढणे, हा प्रकृतीस धोका आहे, म्हणून जर तसे झाले असेल तर तसे अतिरिक्त वजन कमी करणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. आरोग्यपूर्ण संतुलित वजन साध्य करण्यासाठी नियमित शारीरिक हालचाल महत्त्वाची आहे. शारीरिक हालचालीमुळे आपल्या शरीरातून अतिरिक्त उर्जा जळते आणि आत येणारी उर्जा संतुलित करते (अन्न आणि पेयांतून).
      • कोलेस्टेरॉलवर चांगले नियंत्रण: हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी आपल्याला चांगले कोलेस्टेरॉल (एचडीएल) आवश्यक तर असते परंतु, कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्यास हृदयविकार होऊ शकतो. आपल्या रक्तातील एकूण कोलेस्टेरॉल बहुतेक वाईट कोलेस्टेरॉल (एलडीएल) पासून बनलेले असते. केवळ थोडासा भाग चांगल्या कोलेस्टेरॉलचा (एचडीएल) असतो. ट्रान्स चरबी आणि संतृप्त चरबीयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने प्रामुख्याने रक्तातील कोलेस्टेरॉल वाढते. तुम्ही उच्च एचडीएल कोलेस्टेरॉलचे आणि कमी एलडीएल कोलेस्टेरॉलचे उद्दिष्ट ठेवायला हवे. आहारात साधे बदल आणि व्यायामांद्वारे हे तुम्ही साध्य करू शकता.
      • रक्तातील साखर: जेव्हा शरीर पुरेसे इन्शुलिन तयार करु शकत नाही अथवा स्वत:चे इन्शुलिन हवे तसे वापरू शकत नाही किंवा दोन्ही परिस्थितीत- रक्तातील साखरेच्या उच्च प्रमाणानुसार रक्तातील साखर किंवा मधुमेह आहे असे म्हणले जाते. आनुवंशिक स्थिती असलेला मधुमेह, हृदयरोगाचा धोका वाढवतो. जर आपल्या रक्तातील साखर जास्त असेल तर ती नियंत्रणात आणण्यासाठी जीवनशैली बदलणे, व्यायाम करणे आणि नियोजित आहार घेणे आवश्यक आहे.
      • रक्तदाब: आपण काय करत आहोत यानुसार दिवसभरात आपला रक्तदाब वाढू शकतो अथवा कमी होऊ शकतो. जेव्हा हा दाब खूप जास्त असतो आणि तसाच काही काळ राहतो तेव्हा त्यामुळे शरीरास गंभीर नुकसान होऊ शकते. विविध दिवसात दोन वेगवेगळ्या वेळांस मोजल्यास १४०/९० पेक्षा जास्त असल्यास त्यास उच्च रक्तदाब असे म्हणले जाते. कोणत्याही वयाच्या निकषाशिवाय सामान्य रक्तदाब १२०/८० मिमी एचजी असतो. अनियंत्रित उच्च रक्तदाबावर उपचार न केल्यास हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि/किंवा हृदय बंद पडणे अशा अनेक गुंतागुंती होऊ शकतात. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना हृदयरोग रोखण्यासाठी जीवनशैलीमध्ये आरोग्यवर्धक बदल करावे लागतील.

      वरील गोष्टीं व्यतिरिक्त, आरोग्य शिक्षणातून आरोग्याबद्दल जागरूकता आणि मिठाचे जास्त सेवन टाळणे, पुरेशा फळे आणि भाज्यांचे सेवन करणे हे देखील हृदयरोग रोखण्यास मदत करते. तसेच, ज्यांची जनुके ह्रदय रोगास प्रवण आहेत अशा लोकांनी नियमितपणे सुदृढ हृदय तपासणी करून घ्यावी. सुदृढ हृदय तपासणी पॅकेजमध्ये कोलेस्टेरॉल, रक्तातील साखर आणि रक्तदाब मोजणे यांचा समावेश असणे गरजेचे आहे. हृदय विकाराची लक्षणे माहिती असणे आणि जर अशी लक्षणे सूचक असतील तर तात्काळ सल्ला घेणे आवश्यक आहे.

      कुटुंबाचा विपरीत इतिहास हा हृदयाच्या धोक्यात सुधारणा न करता येणारा घटक मानला जातो, पण प्रतिबंधात्मक पावले तुम्हाला त्यावर मात करण्यास मदत करू शकतात.

      https://www.askapollo.com/physical-appointment/cardiologist

      The content is reviewed and verified by our experienced and highly specialized team of heart specialists who diagnose and treat more than 400 simple-to-complex heart conditions. These specialists dedicate a portion of their clinical time to deliver trustworthy and medically accurate content

      Cardiology Image 1

      Related Articles

      More Articles

      Most Popular Articles

      More Articles
      © Copyright 2024. Apollo Hospitals Group. All Rights Reserved.
      Book ProHealth Book Appointment
      Request A Call Back X