1066

Breast Pain

Published On February 18, 2025

स्तनांतील वेदना (मास्टॅल्जिया) म्हणजे काय?

वैद्यकीय भाषेत मास्टॅल्जिया म्हणून ओळखली जाणारी स्तनांतील वेदना जवळपास ७०% महिलांच्या जीवनावर परिणाम करू शकते. स्त्रियांना त्यांच्या मासिक पाळीच्या २-३ दिवस आधी वेदना होणे किंवा ५ दिवसांपेक्षा अधिक काळ ती टिकून राहणे तसे सामान्य आहे. एखादा पोशाख घालणे अथवा कुणी मिठीत घेतल्यास अस्वस्थ वाटण्याइतके ही वाईट असते. अशी वेदना एका स्तनांत अथवा दोन्ही स्तनांत अथवा मासिक पाळीशी संबंधित नसलेली देखील असू शकते. यापैकी ८% महिलांना तीव्र वेदना होतात आणि त्यांच्या सामान्य हालचालींमध्ये व्यत्यय आणतात.

स्तनांतील वेदनांचे तीन प्रमुख प्रकार-

१. चक्राकार – वेदना मासिक पाळीशी संबंधित असते आणि रक्तस्राव सुरू होण्याआधीच सुरू होऊ शकते (पाळीआधीची स्तनांतील वेदना – प्रीमेनस्ट्रुअल मास्टॅल्जिया). ही वेदना रक्तस्राव सुरू झाल्यावर कमी होऊ शकते किंवा पाळीच्या कालावधीत सुरू राहू शकते.

२. चक्राकार नसलेली – वेदना मासिक पाळीबरोबर बदलत नाही. सतत वेदना असू शकते किंवा ठराविक नमुन्याशिवाय येऊ जाऊ शकते.

३. छातीच्या भिंतीत वेदना – ही खरी स्तनांतील वेदना नाही तरी स्नायू आणि स्तनांखालील इतर ऊतकांवर परिणाम करते.

कारणे-

स्तनांतील वेदनेचे कारण तसे ज्ञात नाही पण ते पुढील गोष्टींशी संबंधित असू शकते

  • संप्रेरकांतील बदल
  • मीठाचे जास्त प्रमाणात सेवन – द्रव साठून राहिल्याने सूज वाढते
  • गर्भधारणा
  • स्तनात तंतुशोथीय (फायब्रोसिसस्टिक) बदल
  • स्तनातील गाठी
  • स्तनातील हाडाची आणि बरगड्यांमधील सूज

तुम्हाला स्तनांत वेदना होत असल्यास काय करावे?

  • स्तनाची संपूर्ण तपासणी करा.
  • स्तनातील वेदना आणि मासिक पाळीची नोंद ठेवा. वेदनेच्या तीव्रतेची दैनिक नोंद ठेवा.
  • योग्य प्रकार आणि आकाराची ब्रा परिधान करत असल्याची खात्री करा. ब्राचा चांगला आधार मिळणे आवश्यक आहे.
  • ताण कमी करण्याचे आणि विश्रांतीचे मार्ग शोधा
  • तुम्हाला क्ष किरणांनी किंवा इन्फ्रारेड किरणांनी तपासणी (मॅमोग्राफी) करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.

संप्रेरकांचे उपचार किंवा गर्भनिरोधके स्तनातील वेदना वाढवतात का?

संतती प्रतिबंधक गोळी किंवा संप्रेरक उपचार पद्धतीमुळे स्तनात वेदना होऊ शकते, वाढू किंवा कमी होऊ शकते. काही महिलांना ही औषधे प्रथमच सुरू केल्यावर स्तनात वेदना होऊ शकते. अशी स्तनातील वेदना हळू हळू थांबते.

स्तनांतील वेदना कर्करोगाशी संबंधित असते का?

कोणतीही गाठ नसेल तर स्तनांतील वेदना कर्करोगामुळे होणे हे अगदी दुर्मिळ आहे. तुम्हाला काळजी वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कशाची मदत होते?

  • तोंडी गर्भनिरोधके- स्तनांतील वेदना संप्रेरकांमधील चढ उतारामुळे होत असल्यास तोंडी गर्भनिरोधकांमुळे बरेचदा थांबते.
  • प्रतिजैविके (अँटीबायोटिक्स) – संक्रमणामुळे होणारी स्तनांतील वेदना असल्यास प्रतिजैविकांची गरज लागते.
  • कमी मीठाचा आहार- क्षाराचा (सोडियम) आहारात समावेश कमी केल्यास द्रव साठून राहिल्याने स्तनातील वेदना कमी होण्यात मदत होते.
  • स्टिरॉइड नसलेली संक्रमणरोधी औषधे- जसे आयबुप्रोफेन नावाचे औषध बरेचदा स्तनातील वेदनेत प्रभावी आराम देते.
  • ई आणि बी६ जीवनसत्वे स्तनाच्या वेदनेच्या उपचारांत मदत करत असल्याचे सिद्ध झाले आहे.
  • इव्हिनिंग प्राईमरोझ तेल. काही अभ्यासांनी सिद्ध केले आहे की दररोज ३००० मिग्रॅ घेतल्यास स्तनाच्या वेदना कमी होण्यात मदत होते
  • जवस. दोन चमचे दळलेले जवस (जवसाचे तेल नव्हे) ३ महिने दररोज घेतल्याने चक्राकार स्तन वेदनेत उपयोगी पडत असल्याचे एका अभ्यासात आढळले आहे.

Could not find what you are looking for? 

Request a Callback

Image
Image
Request A Call Back
Request Type
Image
Doctor
Book Appointment
Book Appt.
View Book Appointment
Image
Hospitals
Find Hospital
Hospitals
View Find Hospital
Image
health-checkup
Book Health Checkup
Health Checkup
View Book Health Checkup
Image
Doctor
Book Appointment
Book Appt.
View Book Appointment
Image
Hospitals
Find Hospital
Hospitals
View Find Hospital
Image
health-checkup
Book Health Checkup
Health Checkup
View Book Health Checkup