Home Healthy Living Arrhythmia

      Arrhythmia

      Cardiology Image 1 Verified By Apollo Cardiologist June 23, 2023

      6713
      Arrhythmia

      एऱ्हिद्मिआ (ताल नसणे) – ह्रदयाची अनियमित किंवा असामान्य लय

      विहंगावलोकन

      अंतर्गत विद्युत संकेतांमुळे हृदयाचे आकुंचन व शिथिलीकरण होते आणि हृदयाचे ठोके पडतात. ही अंतर्गत विद्युत प्रणाली आपल्या हृदयाच्या ठोक्यांचा ताल आणि दर नियंत्रित करते. या विद्युत प्रणालीचे कार्य जेव्हा बिघडते तेव्हा हृदयाचे ठोके खूप जास्त वेगाने किंवा खूप संथपणे किंवा अनियमितपणे पडतात.
      अशा प्रकारे हृदयाची लय अनियमित होण्याला एऱ्हिद्मिआ असे म्हणतात. यामध्ये हृदयाचे काही ठोके वगळले जाऊ शकतात, जे धडधडणाऱ्या हृदयासाठी त्रासदायक असू शकते आणि त्यामुळे हृदयाला दीर्घकालीन नुकसान होऊ शकते किंवा अगदी जीवघेणेही ठरू शकते.
      हृदयाच्या लयीमधील हा अडथळा वय, हायपरटेन्शन, हृदय विकाराचा झटका, हृदय बंद पडणे, थायरॉईड आणि फुफ्फुसांचे आजार इत्यादींमुळे निर्माण होऊ शकतो. यातील सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे धडधडणे (हृदयाचे ठोके वेगात पडणे), श्वास घेण्यात अडचण येणे, गरगरल्यासारखे वाटणे, बेशुद्ध पडणे किंवा अचानक मृत्यू होणे.

      एऱ्हिद्मिआचे उपचार अनेकदा वेगाने, संथ किंवा अनियमित चालणारे हृदयाचे ठोके नियंत्रित करतात किंवा हा दोष काढून टाकतात. तसेच, हृदयाचा त्रासदायक एऱ्हिद्मिआ अनेकदा कमकुवत किंवा सदोष हृदयामुळे असू शकतो किंवा त्यामुळे तो बिघडू शकतो. हृदयासाठी निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करून तुम्ही एऱ्हिद्मिआची जोखीम कमी करू शकता.

      एऱ्हिद्मिआची लक्षणे

      एऱ्हिद्मिआच्या कोणत्याही स्पष्ट खुणा किंवा लक्षणे कदाचित नसू शकतात. तुम्हाला स्वतःला समजण्यापूर्वी, तपासणी दरम्यान खरे तर तुमचे डॉक्टरच शोधून काढू शकतात की तुम्हाला एऱ्हिद्मिआ आहे. स्पष्ट खुणा किंवा लक्षणे असली तरी तुम्हाला गंभीर समस्या असेलच असेही नाही. तथापि, दिसून येणाऱ्या एऱ्हिद्मिआच्या लक्षणांत समावेश होतो:

      • छातीत दुखणे
      • घाम येणे
      • भोवळ येणे किंवा भोवळ आल्यासारखे वाटणे
      • हृदयाचे ठोके मंद होणे (ब्रॅडीकार्डिया)
      • हृदयाचे ठोके जोरात पडणे (टॅकिकार्डिया)
      • छातीत फडफडणे
      • धाप लागणे
      • गरगरणे किंवा डोके हलके होणे

      एऱ्हिद्मिआची कारणे
      तुमचे ह्रदय निरोगी असतानाही एऱ्हिद्मिआ होऊ शकतो किंवा तो पुढील कारणांमुळे असू शकतो:

      • ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे ह्रदयाला झालेली इजा किंवा कदाचित आत्ता ह्रदयविकाराचा झटका येत असेल
      • ह्रदयाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर बरे होण्याची प्रक्रिया
      • उच्च रक्तदाब
      • मधुमेह
      • तणाव
      • धूम्रपान
      • झोपेत श्वसनात अडथळा येणे (स्लीप एप्निया)
      • जास्त प्रमाणात मद्यपान किंवा कॅफिनचे सेवन
      • हृदयाच्या स्नायू किंवा हृदयाच्या संरचनेत बदल (जसे की कार्डियोमायोपॅथीमुळे)
      • हृदयरोग, जसे की हृदय रोहिण्यांमध्ये अडथळा निर्माण होणे (कोरोनरी आर्टरी डिसिज)
      • रक्तातील सोडियम किंवा पोटॅशियमसारख्या विद्युत अपघटनींचे (इलेक्ट्रोलाइट्सचे) संतुलन बिघडणे
      • हायपरथायरॉईडीझम (अतिसक्रिय थायरॉईड ग्रंथी) किंवा हायपोथायरॉईडीझम (कमी सक्रिय थायरॉईड ग्रंथी)
      • दुकानात सहज मिळणारी ऍलर्जी आणि सर्दीसाठीची औषधे आणि पूरक घटक
      • काही पौषक पूरक घटक
      • अंमली पदार्थांचा गैरवापर
      • आनुवंशिकता

      एऱ्हिद्मिआचे प्रकार

      भिन्न प्रकारचे एऱ्हिद्मिआ आहेत. ह्रदयाच्या दराच्या वेगानुसार तसेच त्याचे मूळ जिथे आहे अशा ह्रदयाच्या कप्प्यांनुसार (कर्णिका किंवा जवनिका) डॉक्टरांनी एऱ्हिद्मिआचे ढोबळ वर्गीकरण केलेले आहे.: एऱ्हिद्मिआच्या प्रकारांत समावेश होतो:

      टॅकिकार्डिया

      यामध्ये हृदयाचे ठोके जोरात पडतात – आरामाच्या स्थितीत ह्रदयाचे दर मिनिटाला १०० ठोके पडतात.
      i) कर्णिकेतील टॅकिकार्डिया (कर्णिकेत मूळ असलेला टॅकिकार्डिया) यामध्ये समावेश होतो:
      अ) कर्णिकेतील धडधड: कर्णिकेतील अव्यवस्थित विद्युत आवेगांमुळे ऱ्हदयाचा दर वेगात वाढतो. वृद्ध लोकांमध्ये कर्णिकेतील धडधड सर्वात सामान्य आहे. यामुळे मृत्यूची जोखीम वाढू शकते आणि पक्षाघातासारख्या काही गुंतागुंतीच्या स्थिती निर्माण होऊ शकतात.
      ब) कर्णिकेतील फडफड: कर्णिकेतील धडधडीसारखेच, कर्णिकेतील फडफड म्हणजे सुद्धा अव्यवस्थित विद्युत आवेगांमुळे ऱ्हदयाचा दर वेगात वाढणे असते. परंतु, कर्णिकेतील फडफडीमध्ये, ह्रदयाचे ठोके जास्त तालबद्ध विद्युत आवेगांमुळे पडतात आणि कर्णिकेतील धडधडीच्या तुलनेत जास्त सुव्यवस्थित असतात. कर्णिकेच्या फडफडीमुळे पक्षाघात आणि इतर गंभीर गुंतागुंती निर्माण होऊ शकतात
      क) सुप्राव्हेन्ट्रिकल टॅकिकार्डिया: ही एक व्यापक संज्ञा आहे ज्यामध्ये एऱ्हिद्मिआचे मूळ, कर्णिकेतील जवनिकेच्या वर (सुप्राव्हेन्ट्रिकल) असते. याच्या कालावधीत फरक असतो आणि सहसा अचानक ह्रदयाचे ठोके जाणवण्याशी संबंधित असतो.

      ii) जवनिकेतील टॅकिकार्डिया (जवनिकेत मूळ असलेला टॅकिकार्डिया) यामध्ये समावेश होतो:
      अ) जवनिकेचा टॅकिकार्डिया (व्हिटी): जवनिकेचा टॅकिकार्डिया म्हणजे वेगवान, नियमित ह्रदयाचा दर, ज्याचे मूळ ह्रदयाच्या जवनिकेतील असामान्य विद्युत आवेगांमध्ये असते. ही एक जीवघेणी स्थिती आहे आणि त्यामुळे त्यावर त्वरित उपचार करावे लागतात.
      ब) जवनिकेची धडधड: जवनिकेची धडधड ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये, जवनिकेचे ठोके इतक्या वेगाने पडतात की त्यामुळे ह्रदयाकडे रक्त पाठवले जाऊ शकत नाही आणि परिणामी अचानक मृत्यू होतो. ह्रदय कमकुवत असलेल्या लोकांमध्ये हे प्रामुख्याने घडते. परंतु दीर्घ क्यूटी सिंड्रोम आणि ब्रुगाडा सिंड्रोम यांसारख्या अनुवंशिक ह्रदयाच्या असामान्यता असलेल्या सामान्य ह्रदय असलेल्या लोकांमध्येही याचा प्रभाव पडू शकतो.

      अकालिक ह्रदयाचे ठोके

      सर्वसाधारणपणे, अकालिक ह्रदयाचे ठोके म्हणजे एखादा ठोका चुकणे किंवा वगळला जाणे. सहसा हे निरुपद्रवी असतात, परंतु वारंवार घडल्यास त्यामुळे वरचेवर लक्षणे निर्माण होतात आणि/किंवा ह्रदय कमजोर होऊ शकते. त्यामुळे याचा उपद्रव होतो.

      ब्रॅडीकार्डिया (हृदयाचे ठोके मंद होणे)

      ब्रॅडीकार्डिया ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये हृदयाचे ठोके मंद होतात, अर्थात आरामाच्या स्थितीमधअये मिनिटाला ६० हून कमी ठोके पडतात. जर तुमच्या हृदयाचा दर संथ असेल आणि ह्रदय पुरेसे रक्त आत-बाहेर करू शकत नसेल तर तुम्हाला पुढीलपैकी एक ब्रॅडीकार्डिया असू शकतो:
      i) सायनस नोड डिसफंक्शन (नाकाच्या पोकळीतील उंचवट्याचे अपकार्य): या स्थितीमध्ये, सायनस नोड (आपल्या ह्रदयाचा सामान्य पेसमेकर) विद्युत प्रवाह निर्माण करतो, परिणामी ह्रदयाचे ठोके मिनिटाला ६० हून कमी होतात. जर या स्थितीतून गरगरणे, थकवा, बेशुद्ध पडणे किंवा अशक्तपणा यासारखी लक्षणे निर्माण झाली तर त्यासाठी उपचार आवश्यक असू शकतात.
      ii) कन्डक्शन ब्लॉक (वहन अवरोधन): ह्रदयाच्या वहन मार्गामध्ये सहसा जवनिकेत किंवा एव्ही नोडच्या जवळ (अँट्रिओव्हेन्ट्रिक्युलर – कर्णिका व जवनिकेच्या उंचवट्याजवळ) अडथळा निर्माण झाल्यामुळे ह्रदयाचे ठोके संथ होतात.

      सारांश

      एऱ्हिद्मिआ किंवा इतर कोणत्याही ह्रदय रोगाची जोखीम करण्यासाठी ह्रदयास पूरक जीवनशैलीचा अंगिकार करणे महत्त्वाचे आहे. ह्रदय रोगाला प्रतिबंध करण्यासाठी, ह्रदयासाठी पौष्टिक असलेला आहार घ्या, शारीरिक हालचाली वाढवा, धूम्रपान सोडून द्या, योग्य वजन राखा आणि मद्यपान व कॅफेनचे सेवन टाळा किंवा मर्यादित ठेवा. ताण कमी करा, कारण खूप जास्त ताण आणि रागामुळे ह्रदयाच्या तालाची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच, दुकानात सहज मिळणारी औषधे सावधपणे वापरा कारण सर्दी, खोकला, ऍलर्जीसाठीच्या काही औषधांमधील उत्तेजकांमुळे ह्रदयाचे ठोके वेगात पडू शकतात.

      https://www.askapollo.com/physical-appointment/cardiologist

      The content is reviewed and verified by our experienced and highly specialized team of heart specialists who diagnose and treat more than 400 simple-to-complex heart conditions. These specialists dedicate a portion of their clinical time to deliver trustworthy and medically accurate content

      Cardiology Image 1

      Related Articles

      More Articles

      Most Popular Articles

      More Articles
      © Copyright 2024. Apollo Hospitals Group. All Rights Reserved.
      Book ProHealth Book Appointment
      Request A Call Back X