Verified By Apollo Hospitals October 1, 2024
द्वारा – डॉ. सुनिल कुमार स्वेन
एमबीबीएस, एमएस, एमसीएच (ह्रदय शस्त्रक्रिया, एम्स), एफआयएसीएस
सल्लागार बाल ह्रदय शल्यचिकित्सक (कन्सल्टंट पेडिअॅट्रिक कार्डिअॅक सर्जन)
ह्रदयातील जन्मजात दोष किंवा जन्मजात ह्रदय विकार हा जन्मजात असणारा ह्रदयाच्या स्थूल रचनात्मक असामान्यतेचा एक गट असतो. जन्मानंतर लगेच किंवा बालपणात कोणत्याही स्थितीला हा उघड होतो.
१००० नवजात बालकांपैकी ८ बालकांना जन्मजात ह्रदय विकार असतो. सर्वात सामान्यपणे घडणारा जन्मजात विकार म्हणून, सर्व जन्मजात आजारांपैकी २८% जन्मजात ह्रदय विकार असतात. यामुळे जगभरामध्ये दरवर्षी १३ लाख ५० हजार बालके जन्मजात ह्रदय विकारासह जन्माला येतात.
जन्मजात ह्रदय विकाराची कारणे काय आहेत?
ते अनुवंशिक असू शकतात, गर्भावस्थेत कोणत्या औषधाच्या सेवनामुळे, मद्यपान किंवा अंमली पदार्थांचा गैरवापर केल्याने किंवा गर्भावस्थेत विविध विषाणूचे संक्रमण झाल्यामुळे होऊ शकतात.
बहुतांश रुग्णांमध्ये जन्मानंतर किंवा पहिल्या वर्षामध्येच लक्षणे दिसतात. काही मोजक्या मुलांमध्ये बालपणातील नंतरच्या स्थितीला किंवा अगदी प्रौढावस्थेतही दिसू शकतात.
ह्रदय विकार असलेल्या बहुतांश मुलांमध्ये धाप लागणे, वेगाने श्वास घेणे, दूध नीट न पिणे, वजन नीट न वाढणे, त्वचा, नखे, ओठ, जिभेचा खालचा भाग निळसर दिसणे, वारंवार खोकला, थंडी,ताप, छातीतील संक्रमण किंवा न्युमोनियामुळे वारंवार रुग्णालयात भरती करणे, स्तनपान करता न येणे, स्तनपान करताना कपाळावर घाम येणे ही लक्षणे दिसतात. ही लक्षणे स्वतंत्रपणे किंवा एकत्रितपणे दिसू शकतात. कधीकधी या मुलांमध्येही लक्षणे दिसतच नाहीत.
विविध प्रकारचे जन्मजात ह्रदय विकार आहेत, परंतु दोन श्रेणींमध्ये यांची व्यापकपणे विभागणी केली जाते, ती म्हणजे सायनोटिक (नीलमय) आणि असयानोटिक (अनीलमय) ह्रदय विकार. सायनोटिक (नीलमय) ह्रदय विकार असलेल्या बाळांमध्ये तीव्र सायनोसिस (नीलमयता) (शरीराचा रंग निळसर दिसणे) दिसतो तर असायनोटिक (अनीलमय) बाळांमध्ये निळसरपणा दिसत नाही. एकूण जन्मजात ह्रदय विकारांमध्ये जवळपास २/३ असायनोटिक (अनीलमय) विकार असतात.
ईसीजी, छातीची क्ष-किरण तपासणी आणि इकोकार्डिओग्राफी करून बहुतांश निदान केले जाते. ज्या मोजक्या प्रकरणांमध्ये इकोकार्डिओग्राफीमध्ये पूर्ण माहिती मिळत नाही तिथे, सीटी अँजिओग्राफी किंवा कार्डिऍक कॅथेरायझेशन या निदानाच्या पर्यायी पद्धती आहेत.
होय. दोन तृतियांश रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात. ते बरे होऊ शकतात आणि उपचारांनंतर सामान्य जीवन जगू शकतात. बाकीच्या एक तृतियांश (गुंतागुंतीचे जन्मजात ह्रदय विकार) रुग्णांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि सामान्य जीवनाइतके आयुर्मान मिळण्यासाठी उपशामक औषधे दिली जाऊ शकतात.
त्यांच्यावर एकतर बंद ह्रदय शस्त्रक्रिया किंवा खुले ह्रदय शस्त्रक्रिया करून उपचार केले जातात. कधीकधी शस्त्रक्रियेविना हस्तक्षेप करूनही त्यांच्यावर उपचार केले जाऊ शकतात.
अर्थात प्रौढांपेक्षा लहान बाळांमधील खुले ह्रदय शस्त्रक्रियेची जोखीम जास्त असते. परंतु प्रगत तंत्रज्ञान आणि विज्ञानामुळे मृत्यूदर आणि विकृती दर ठळकपणे कमी झाला आहे. सरासरी १ ते १०% इतकी शस्त्रक्रियेची जोखीम असते.
वाढीच्या टप्प्याच्या प्रारंभीच उपचार झाल्यामुळे त्यांपैकी बहुतांश मुलांचा आजार बरा होऊन ती सामान्य जीवन जगतात आणि त्यांना खेळ, शैक्षणिक उपक्रम इत्यादींमध्ये सक्रियपणे सहभागी होता येते.
जन्मानंतर लगेच किंवा कोणत्याही वयापर्यंत त्यांच्यावर उपचार केले जाऊ शकतात. त्यांच्या आजाराची स्थिती कोणती आहे त्यावर हे अवलंबून असते. बहुतेकांवर जन्मानंतर पहिल्या वर्षामध्येच उपचार केले जातात.
या आजारांचे निदान अगदी गर्भावस्थेमध्येही होऊ शकते. यासाठी फेटल इकोकार्डिओग्राफी नावाची चाचणी आहे. अनुभवी बाल ह्रदयरोग तज्ज्ञांद्वारे ती केली जाते. गर्भधारणेच्या १८ ते २४ आठवड्यांमध्ये गर्भवती मातांवर ही चाचणी केली जाते आणि आवश्यक असल्यास गर्भावस्थेच्या २८ व्या आठवड्यात पुन्हा केली जाते. ही एक नक्कीच सुरक्षित प्रक्रिया आहे. या स्थितीला गर्भामध्ये ह्रदयाची समस्या समजल्यास नियोजित प्रसुती आणि प्रसुतीनंतर त्वरित उपचार करण्याची लवचिकता मिळते.
© Copyright 2024. Apollo Hospitals Group. All Rights Reserved.